घरगुती वस्तूंपासून तयार करा ‘फेस पॅक’

धावपळीच्या जीवनशैलीत जगताना स्वतःकडे बर्‍याचदा दुर्लक्ष होताना दिसते. अशावेळी बाजारात उपलब्ध असणार्‍या अनेक सौंदर्य प्रसाधनांचा सर्रास वापर केला जातो. त्याच्या किमती अधिक असतात. परंतु त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी घरच्या घरी त्वचेची काळजी घेता येते.