मराठा क्रांती मोर्चाचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही

Mumbai

मराठा क्रांती मोर्चाने कुठल्याही राजकीय पक्षाला विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिलेला नाही. निवडक कार्यकर्ते काही पक्षांसोबत हातमिळवणी करुन पाठिंबा दिल्याचे भासवत आहेत. मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केले आहे. सरकार मराठा आरक्षणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करत नाही. शिवस्मारक आणि कोपर्डी प्रकरणी सत्ताधारी पक्ष उदासिन होता. त्यामुळे मराठा समाजाने योग्य निर्णय घ्यावा. स्थानिक पातळीवर जो उमेदवार योग्य आहे त्याला मतदान करण्यात येईल, अशी माहिती आबासाहेब पाटील यांनी दिली.