पारिजात संस्थेचा मराठी राजभाषा दिन सोहळा

मुंबईतील पारिजात ही संस्था गेली अनेक वर्षे शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असते. यंदाच्या वर्षीही मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधूनगोष्ट मराठीचीया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठीसांघिक मराठी कथा अभिवाचनस्पर्धा घेण्यात आली.दादर पश्चिमेतील नविनचंद्र मेहता इंस्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी अ‍ॅन्ड डेव्हलेपमेंटयेथे ही स्पर्धा घेण्यात आली असून यात मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे भागातील  २८ शाळांमधून १८० विद्यार्थ्यांचे ५० संघ सहभागी झाले होते