झेंडूच्या दरात ३० ते ४० रुपयांची वाढ

साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणजे दसरा. या सणाला झेंडूच्या फुलांचा आणि आपट्याच्या पानांचा एक वेगळा मान असतो. त्यामुळे यंदाही दसऱ्याच्या निमित्ताने बाजारात झेंडूची फुले आणि आपट्याची पाने मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहेत. मात्र, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत झेंडूचा भाव चढ्या दरात असून झेंडूच्या फुलांच्या दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे.