आता मास्क हीच लस

कोरोनासोबत जगायच म्हणजे मास्क वापरणच सोडून द्यायच अशी समजूत काही मुंबईकरांची झालेय. त्याचाच प्रत्यय आता मुंबईच्या रस्त्यांवर, बेस्ट बस, ऑटोरिक्षा – टॅक्सी आणि कारमध्ये येऊ लागला आहे. पण मास्कच कोरोनाची लस येईपर्यंत आपल्यासाठी ढाल असणार आहे. कोरोना योद्धा म्हणून बाहेर पडता ना ? मग ढाल घरी कशी काय विसरता ?