आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचा नागपूरकरांना संदेश

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. आपल्या धडाकेबाज कामाच्या शैलीमुळे नेहमी चर्चेत राहिलेल्या मुंढे यांची अनेकदा बदली करण्यात आली आहे. नागपूरमधील कार्यकाळ संपल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी एक व्हिडिओ जारी करत नागपूरकरांचे आभार व्यक्त केले आहेत.