नितेश राणेंचा थेट आरोप, E-Passचा बाजार पूर्वनियोजित

सामान्यांना ई-पास मिळत नसताना दलालांच्या मार्फत पैसे दिले की सहज इ पास मिळतात, अशा अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ई-पासचा हा काळाबाजार सरकारच्याच अनुमतीने पूर्वनियोजित आहे, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी माय महानगरच्या ‘खुल्लम खुल्ला’ या स्पेशल शोमध्ये केला आहे.