मिठी नाल्याचे नदीकरण

शहरीकरणाच्या ओघात मुंबईतल्या मिठी नदीचे अस्तित्व नामशेष होत तिचे नाल्यात रूपांतर झाले आहे. गेल्या काही वर्षात मिठी नदी स्वच्छ करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तसेच एनजीओच्या माध्यमातून अनेक प्रयत्न झाले. विशेषतः २००५ च्या पुलानंतर मिठी नदी स्वच्छ करण्याची गरज अनेक तज्ज्ञांकडून पुढे आली. त्यामुळेच एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही वर्षात मिठी स्वच्छ करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे नदीचे खोलीकरण, स्वच्छता मोहीम यासारख्या प्रयत्नांचा समावेश आहे. मिठी नदीसाठी यंदा दोन प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून नदीच्या पाण्याला स्वच्छ करण्याचा प्रयोग होणार आहे. मुंबई विद्यापीठही या प्रयोगात सहभागी होणार आहे. येत्या दीड वर्षात मिठीच्या पाण्यात नक्कीच फरक पडेल असा विश्वास यंत्रणांना वाटतो आहे.