मनसेचे अंधेरीतील के/पूर्व वॉर्डसमोर आंदोलन

MUMBAI

मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून, मुंबईतील अंधेरी भागात तर कोरोना रुग्णासाठी रुग्णालयात बेड नसल्याचे चित्र आहे. याचमुळे अंधेरी पूर्व येथे पालिका वॉर्डसमोर मनसेने आज आगळेवेगळे आंदोलन केले. मनसे विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. खासगी रुग्णालयात नॉन-कोविड रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. यामुळे अनेकांना या लॉकडाऊनमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच अंधेरीत कोविड रुग्णांसाठी सेव्हन हिल रुग्णालय आहे. तेथे मोठ्या संख्येने रुग्ण येत असल्याने इतर रुग्णांसाठी बेडच उपलब्ध होत नाही. अंधेरी पूर्वेत कुठे आणि कोणत्या रुग्णालयात बेड आहेत, याची कोणतीही माहिती दिली जात नाही, असा आरोप यावेळी रोहन सावंत यांनी केला आहे.