मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील जनतेशी घेणदेण नाही!

राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलात सवलत देण्याच्या आधीच्या आश्वासनावरून राज्य सरकारने आता घूमजाव केले आहे. महावितरणची सध्याची परिस्थिती पाहता, अशी सवलत देणे शक्य नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच वीज बिल भरले नाही तर आम्ही बळजबरी करुन वीज बिल भरुन घेऊ, असे सांगण्यात आले आहे. यावरुन पुन्हा एकदा मनसेने राज्य सरकारला इशारा दिला आहे. जर जनतेवर बळजबरी केलात तर तुमची गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आहे. जर तुम्ही असे काही केलात तर आम्ही कायदा हातात घेऊ.