मराठीच्या मुद्यावरून मनसेचा Amazon Flipkart ला दणका

महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी परप्रांतीयांना दणका देणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्टला दणका दिला आहे. अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा उल्लेख नाही. त्यामुळे मनसेने गुरुवारी या दोन्ही कंपन्यांच्या मुंबईतील मुख्यालयांना भेट देत सात दिवसांत अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश न केल्यास तुम्हाला दिवाळी धमाका नाही तर मनसे धमाका दाखवू असा इशारा दिला आहे.