पावसामुळे राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुण्यातून विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचं बिगुल वाजवणार होते. मात्र, नमनालाच घडाभर तेल पडावं, त्याप्रमाणे राज ठाकरेंची पहिलीच सभा रद्द झाली आहे. पुण्यामध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही सभा रद्द करावी लागली आहे. त्यामुळे पुण्यातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबतच राज ठाकरेंची सभा ऐकण्यासाठी जमा झालेल्या पुणेकरांचा देखील हिरमोड झाला आहे.