अपयशी सरकार म्हणून या सरकारकडे पाहिलं जातं – बाळासाहेब थोरात

Mumbai

येत्या २१ तारखेला विधानसभेची निवडणुका आहेत. काँग्रेसचे सातत्याने पाच वर्ष काम सुरू आहे. सरकारच्या अनेक विरोधी धोरणांबाबत सातत्याने आंदोलनं सुरू होती. आजही सर्व क्षेत्रात काम सुरू आहेत. शिवाय, दोन जनसंघर्ष यात्रा ही पूर्ण झाल्या आहेत. येत्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या याद्याही तयार आहेत. जे प्रश्न जनतेचे आहेत, त्यावर तोडगा काढण्याचं काम देखील सुरू आहे. त्यामुळे, येत्या निवडणुकीला सामोरं जायला काँग्रेस तयार असल्याचं महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.