मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ११०० गाड्याची आवक

Mumbai

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज ११०० गाड्याची आवक झाली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या दाखल झाल्याने नियोजन करणे कठीण झाले असले तरी आज मार्केटमध्ये टप्प्याटप्प्याने गाड्या केल्या जात आहेत. गाड्यांवर जंतूनशकांची फवारणी केली जात आहे. तर ग्राहकांना वेगळ्या गेटने प्रवेश दिला जात आहे. तरी सोशल डिस्टन्स पाळण्यात येत नसल्याचे दिसत आहे. मार्केटमध्ये माथाडी, व्यापारी, ग्राहक यांची गर्दी कायम असून गाड्या निर्जंतुकीकरण करून तसेच ग्राहकांना हात धुवून आज पाठवण्यात येत आहेत.