राजकारण्यांनी करावा बेस्टमधून प्रवास

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल गेल्या ६ महिन्यांपासून बंद आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून प्रवाशांना बेस्टने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे लोकल आता तरी सुरु करा अन्यथा दहा हजाराचा भत्ता द्या, अशी मागणी वसई – सावंतवाडी संघटना यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.