दसऱ्याच्या मुहुर्तावर सोन्याऐवजी दुचाकी घेण्याला ग्राहकांची पसंती

साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे दसरा. या दिवशी सोन खरेदीला ग्राहक जास्त प्राधान्य देतात.मात्र या वर्षी सोन्याच्या दरात दरवाढ झाल्याने तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक गणिते कोलमडल्यामुळे ग्राहकांनी वाहन खरेदीला जास्त प्राधान्य दिले आहे. वाहन खरेदीमुळे सरकारच्या तिजोरीत भर पडली आहे.