श्रद्धेची टवाळी नको!

२१ सप्टेंबर १९९५ रोजी दुपारी संपूर्ण भारतभर हर्सोउल्हास झाला. देवळातील गणपती चक्क दूध पिऊ लागले. भाविकांनी देवळाबाहेर रांगा लावल्या. हातात दुधाचा पेला आणि चमच्याने गणेशाच्या मूर्तीला दूध पाजले जात होते आणि आश्चर्य असे की, ती गणेशाची मूर्ती दूध पित होती… म्हणजे सोंडेला लावलेला दूधाचा चमचा रिकामा होत होता. डोळ्यासमोर जे दिसते त्यावर विश्वास ठेवायचा नाही तर कशावर? दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रत्येक देवळातील गणपतीच्या मूर्ती दूध पित होत्या. संपूर्ण देशात एकच बातमी होती…गणपती दूध पितो. केवळ देशातील वृत्तपत्रांनीच नव्हेतर जगभरातील वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेतली. मात्र दुसर्‍या दिवशीपासून या संपूर्ण घटनेची झाली ती टवाळी. त्यावर आसूड ओढले गेले. त्याची अंधश्रद्धा म्हणून हेटाळणी झाली. एका अर्थी घटना खरी असली तरी ती अध्यामिक नक्कीच नव्हती. त्यामागे वैज्ञानिक कारण होते. आज त्याला बरोबर २५ वर्षे पूर्ण होत आहेत. आज त्या प्रसंगाकडे मागे वळून पहाताना त्याची मिमांसा करणे भागच आहे.