कोळीबांधवांच्या नारळीपौर्णिमा सणाचा उत्साह शिगेला

Mumbai

नारळीपौर्णिमा म्हणजे कोळी बांधवांचा उत्साह, आनंद, ऊर्जास्थान. पावसाचा जोर ओसरून समुद्र शांत झाला की नारळीपौर्णिमेची जय्यत तयारी सुरु होते. होड्या, घरे यांची सजावट, मिरवणुका, खाद्यपदार्थ या सगळ्यामुळे कोळी बांधवांमध्ये चैतन्याचं वातावरण असतं. असंच वातावरण बुधवारी नारळपौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्यानिमित्त पाहायला मिळालं.