नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

नाशिक जिल्हा हा कृषी साठी अत्यंत महत्वाचा जिल्हा असून देशातील पहिली रेल्वे नाशिकमधून सुरू होत आहे. नाशिकची ही निवड सार्थ निवड असून किसान रेल्वेच्या माध्यमातून नाशिकच्या कृषी उत्पादनांना व्यापक बाजार पेठ मिळून या रेल्वेचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.