हॉटेल, रेस्टॉरंट बंदीमुळे नाशिकचे कोट्यवधीचे नुकसान

MUMBAI

कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना राज्य सरकारच्या निर्णयामुळे परवानगी मिळालीय. नाशिकमधील हॉटेल्सही आजपासून सुरू झाल्या. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायजर आणि स्वच्छता अशा सर्वच नियमांचं पालन या हॉटेल व्यावसायिकांना करावं लागणार आहे. या निर्णयामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला असला तरीही ग्राहकांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.