आदिवासी विद्यार्थ्यांना IAS बनविण्यासाठी झटणारी शाळा

Mumbai

तब्बल ४१२ पर्यंत पाढे तोंडपाठ, भारतीय संविधानातील सगळीच कलमं अवगत, जगभरातील देशांच्या राजधान्या पुस्तक न पाहता सांगणारे हे विद्यार्थी आहेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील. झेडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आयएएस अधिकारी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून वर्षभरातील ३६५ दिवस दररोज १५ तास शिक्षण देणारी ही राज्यातील एकमेव शाळा आहे. शिक्षक केशव चंदर गावित आदिवासी पाड्यातील पिढी घडविण्यासाठी अहोरात्र झटतायत…