निसर्ग चक्रीवादळामुळे समुद्रातील पाणी नदी पात्रात उलट्या दिशेने शिरले

MUMBAI

नेवरे गावातील सोमगंगा ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. परंतु जानेवारी महिना सुरू झाला की या नदीचे पाणी आटायला लागते. मात्र, अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आणि जास्त उंचीच्या लाटांमुळे जवळपास ५० वर्षांनंतर नदीला पश्चिमेकडून पूर्वेला अशा उलट्या दिशेने पाणी वाहत होते. नदीपात्रात समुद्राचे खारे पाणी शिरल्यावर गोड्या पाण्यातील मासे किनाऱ्यावर येऊन मरत होते. विशेष म्हणजे आजची पिढी उलट्या दिशेने वाहणारे पाणी पाहून चकित झाली होती.