ठाकरे साहेब अजून किती काळ संजय राऊत यांचे समर्थन करणार?

‘आज मुंबई महानगरपालिकेने जी कारवाई केली ती अन्यायकारक आहे. हे कार्यालय दोन वर्षांपुर्वी बांधलेले आहे. ते आताच का तोडले? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुठेतरी राऊत यांना समर्थन आहे, असे दिसत आहे आणि जर मुख्यमंत्र्यांचे समर्थन नसेल तर त्यांनी संजय राऊत यांचा राज्यसभेचा राजीनामा घ्यावा’, अशी भूमिका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा मांडली आहे.