- Advertisement -
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या खासदारांना भाजपने विरोधी बाकावर बसायला भाग पाडले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा विषय मांडला. मात्र खासदार नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेच्या खासदारांना या विषयावरुन फटकारले. नवनीत कौर राणा यांचे पती आमदार रवि राणा यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राणा दाम्पत्य शिवसेनेवर टीका करत आहेत.
- Advertisement -