मतदारसंघाच्या विकासासाठी मी सज्ज

Mumbai

मुंबईतील अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार नवाब मलिक निवडणूक लढवत आहेत. २०१४ च्या निवडणुकीत अतिशय कमी फरकाने त्यांचा पराभव झाला होता. मात्र यावेळी त्यांनी आघाडी आणि विरोधी पक्षांची मोट बांधत मतदारसंघासाठी २१ सूत्री कार्यक्रम दिला असल्याचे त्यांनी सांगितले.