उलटी गिनती शुरू; या दिवशी सुरू होणार ‘सेक्रेड गेम्स २’

Mumbai

अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची मुख्य भुमिका असलेली ‘सेक्रेड गेम्स’ही वेबसिरीज लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. या वेबसिरीजचा दुसरा सिझन कधी येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. सॅक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तमाम चाहत्यांसाठी सहा एप्रिलला ‘सेक्रेड गेम्स २’चा प्रमो प्रदर्शित झाला. या प्रोमोला प्रेक्षकांनी चांगलीपसंती दिली.सेक्रेड गेम्स २ चा प्रमो बघितल्यानंतर दुसऱ्या सिझनची उत्सुकता वाढणार आहे. कारण ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये कल्की कोच्लिन आणि रणवीर शौरी या दोघांची एन्ट्री झालीय. हा सिझन कधी सुरू होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.