वृत्तवाहिन्या मुळ मुद्द्यांपासून लोकांना दूर नेतायत – जयंत पाटील

“आज देशात सर्वाधिक मोठी समस्या ही कोरोना विषाणूची आहे. तरिही सुशांत सिंह, कंगना राणावत यांना जास्त महत्त्व दिले जात आहे. आता लोकांनीच कशाला, किती महत्त्व द्यायचे हे ठरवावे”, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माय महानगरज्या खुल्लमखुल्ला या मुलाखतीदरम्यान केले.