नाशिकच्या बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

MUMBAI

कोरोनाबाधित व्यापार्‍याचा मृत्यू झाल्यानंतर तीन दिवस बंद असलेली नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा सुरू झाली. दरम्यान, बाजार समितीने आवारात निर्जंतुकीकरण करत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून केवळ व्यापार्‍यांनाच खरेदीसाठी परवानगी दिली. बाजार समितीमध्ये पुन्हा लिलाव सुरू करण्यात आला. मात्र आपलं महानगरने प्रत्यक्षात बाजार समितीचा फेरफटका मारता असताना कुठेही सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, वाहन चालकांची तपासणी याचे पालन होताना दिसले नाही. बाजार समितीमधील हे चित्र बघता तेथील परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी एक तर बाजार समितीकडून सख्त अंमलबजावणी करून घ्यावी किंवा पोलीस यंत्रणा तैनात करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.