नाशिकच्या घोटी बाजारपेठेत नियमांची पायमल्ली

Mumbai

इगतपुरी तालुक्यातील १२२ खेडेगावातील शेतकरी त्यांचा माल घेऊन घोटी येथील बाजारपेठेमध्ये येतात. तो माल खरेदी करण्यासाठी मुंबईहून व्यापारी आलेले आहे. परंतु बहुतांश व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची काळजी घेतलेली नसल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. सर्व व्यापारी तसेच तालुक्यातील शेतकरी हे सरकारी आदेशाची पायमल्ली करताना दिसत आहेत. घोटी ग्रामपालिका प्रशासनाने येथील बाजार हा अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याबाबतचे पत्र घोटी पोलीस स्टेशनला दिले आहे. तसेच स्थानिक नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न यामुळे उपस्थित होत असून करोनाला आळा घालण्यासाठी घोटी सिन्नर फाटा येथील बाजार हा पूर्णपणे बंद करण्यात यावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.