रुग्णाच्या नातेवाईकांचा KEM मध्ये राडा

मुंबईच्या KEM Hospital मधला एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुग्ण दगावल्यानंतर त्याला जिवंतपणीच मृत घोषित केल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी तिथे उपस्थित असलेल्या महिला निवासी डॉक्टरलाच अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करायला सुरूवात केली. तसेच, रुग्णालयात आरडाओरडा करत राडा घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. मात्र, व्हेंटिलेटरमध्ये दाखवत असलेल्या ग्राफचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे रुग्णाचे नातेवाईक आक्रमत झाल्याचं स्पष्टीकरण रुग्णालयाने दिलं आहे.