काय बोलणार या लोकांना? मिरवणूक काढून करोना पसरवतायत का?

MUMBAI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता टाकून लोकांनी रस्त्यावर आज मिरवणूका काढल्या. आपल्या खिडकी किंवा बाल्कनीतून आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करायचे असताना लोकांनी मिरवणूक काढून ढोल बडवले. सकाळपासून जनता कर्फ्यू पाळणारी जनता अतिउत्साही होत रस्त्यावर उतरल्यामुळे करोना पसरण्याचा धोका वाढणार नाही का?