विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

Mumbai

मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार प्रवीण दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे विधीमंडळ गटनेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपमध्ये चांगलीच स्पर्धा लागली होती. मागचे काही दिवस मराठवाड्याचे नेते आणि फडणवीस यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे सुरजितसिंह ठाकूर यांची या पदासाठी निवड होईल, अशी चर्चा होती. तसेच विधानपरिषदेतील ज्येष्ठ आमदारा भाई गिरकर यांचेही नाव चर्चेत होते. मात्र या सर्वांना मागे सारत प्रवीण दरेकर यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.