खासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच

MUMBAI

एका बाजूला खाजगी हॉस्पिटल्सनी कोविड रुग्णांना अवाजवी शुल्क आकारू नये, असे राज्य शासनाचे आदेश असतानाही लूट सुरू आहे. बोरीवली येथील एका खासगी रुग्णालयातील हा प्रकार समोर आला आहे. रुग्ण व्यक्ती मृत पावली आहे. जवळपास ९ लाख रुपये बिल झाले आहे. ५ लाख रूपये भरले असून उर्वरित शुल्क रक्कम भरत नाही तोपर्यंत मृतदेह मिळणार नाही, असे रुग्णालय व्यवस्थापन सांगत असल्याचे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. याबाबत नयन कदम हे माहिती देत आहेत.