त्या महिलेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; लष्करातील जवानांना केली शिवीगाळ

Mumbai

काही दिवसांपूर्वी पुण्यातील बावधन येथे दारूच्या नशेत नॅनो कारचा चुराडा करणाऱ्या महिलेने पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. त्यासोबतच ती सैन्यदलातील जवानांनाही शिव्या देत होती. मात्र त्याचे कारण समोर आले नव्हते. आता त्याच महिलेचा एक आणखी व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती लष्कराच्या जवानांना शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे.