ठाण्याच्या सोसायटीत कचऱ्यात निघाला अजगर

गेल्या काही वर्षांमध्ये मानवी वसाहतीमध्ये वन्य प्राण्यांचा शिरकाव झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. कधी बिबट्या दिसतो, तर कधी वाघ. साप तर सर्रासपणे वसाहतींमध्ये, सोसायट्यांमध्ये दिसून येतात. ठाण्यामध्ये नुकत्याच समोर आलेल्या घटनेमध्ये चक्क एका डस्टबिनमध्ये भलामोठा अजगर सापडला आहे. या प्रकारामुळे आसपासच्या लोकांना चांगलाच धक्का बसला आहे. तुमच्याही सोसायटीमध्ये जर डस्टबिन असतील आणि तुमची वसाहत झाडीच्या किंवा डोंगरी भागाच्या जवळ असेल, तर अशा ठिकाणी वावरताना काळजी घेणं हे कधीही चांगलंच! ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या आवारात असणाऱ्या एका डस्टबिनमध्ये हा अजगर आरामात ठाण मांडून बसलेला सापडला. यानंतर सर्पमित्र अनिल कुबल आणि अजय लोखंडे यांनी या अजगराला ताब्यात घेतलं आहे.