राजेश्री शिरवडकरांनी स्वत: तळले गरजूंसाठी वडे

Mumbai

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. पण या काळात हातावर पोट असणाऱ्यांची काळजी सध्या भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर घेत आहेत. साईन – माटूंगा परिसरातील गरजू लोकांना सध्या जेवण देण्याचे काम नगरसेविका राजेश्री शिरवडकर करत आहेत. दररोज वेगळं काहीतरी जेवायला मिळावं याकडे त्यांचा कल आहे. त्यामुळेच त्यांनी खास बटाटा वड्याचा बेत आखला.