हे राजे आपल्यात नको, मी आधीच म्हणालो – रामराजे

Mumbai

‘दहा वर्ष शरद पवारांच्या मागे लागलो होतो की यांना आपल्या पक्षात ठेवू नका. हे गेले फार बरं झालं. आता काही झालं तरी यांना पुन्हा घेऊ नका.” अशी विनंती शरद पवारांना करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवली. उदयनराजे यांचे नाव न घेता फक्त कॉलर उडवून राजराजे यांनी उदयनराजेंवर टीका केली.