स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीसा

Mumbai

एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची जनाशीर्वाद यात्रा हि सांगली जिल्ह्यात आली होती. यावेळी कडकनाथ कुक्कुटपालन घोटाळा चांगलाच गाजत होता. शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे आणि वाळवा तालुका अध्यक्ष भगवान जाधव यांनी गनिमी काव्याने आंदोलन करत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकल्या होत्या. त्यानंतर राज्यभर हा विषय चर्चेला आला होता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी पोलिसांनी अटक हि केली होती. मात्र काही काळाने त्यांना न्यालयानाने जमीन मंजूर केला. हे प्रकरण उलटून महिनाही होत नाही तोपर्यंत आज सांगली पोलिसांनी महेश खराडे आणि भगवान जाधव यांना दोन वर्षासाठी सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून तडीपारी का करुनये अशा आशयाची नोटीस बजावली आहे.