सातपाटीमध्ये आढळला दुतोंडी स्पेडनोझ शार्क

महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रामधून प्रथमच दुतोंडी शार्क माशाच्या प्रजातीची नोंद झाली आहे. पालघरच्या सातपाटी येथे मच्छीमारांना हा दुतोंडी शार्क आढळून आला. ‘स्पेड नोझ शार्क’ प्रजातीमधील या दुतोंडी शार्कची ही दुर्मीळ नोंद झाल्याने अशा प्रकारच्या नोंदी तज्ज्ञांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मच्छीमारांना सागरी जीवशास्त्रज्ञांनी केले आहे.