छत्रपती संभाजी महाराजांचे मराठा आरक्षणासाठी मराठीत भाषण

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे राज्यसभेतील सदस्य छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी हा विषय राज्यसभेत मांडला. तसेच हा विषय मांडताना मला मराठीत बोलू द्या, अशी विनंती त्यांनी सभापती यांच्याकडे केली. त्यांच्यानंतर काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी देखील मराठा आरक्षणासंबंधी आपली भूमिका मांडली.