संडे हो या मंडे, शेळी रोज खाते अंडे

Mumbai

सांगली जिल्ह्यातील वाझर गावातील एक शेळी दररोज  चार ते पाच अंडी फस्त करते. ही नॉन वेजीटेरियन शेळी सध्या सांगली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. शेतकरी दत्तात्रय जाधव यांच्या शेळीपालन शेडमधील ही शेळी असून तिला पाहायला अनेक शेतकरी येत आहेत.