माझी आई, भाऊ कोरोना पॉझिटिव्ह, ICU मध्ये दाखल, संजय राऊत यांची राज्यसभेत माहिती

भाजपकडून संसदेत महाराष्ट्रावर सतत आरोप केला जात आहे की, कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र अपयशी ठरला आहे. महाराष्ट्राने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच आम्ही उपाययोजना करत असल्याचे संजय राऊत यांनी राज्यसभेत सांगितले. तसेच काल राज्यात एका दिवसात ३० हजार लोक कोरोनातून बरे झाले. ते काय भाभीजी के पापड खाऊन बरे झालेत काय? असा प्रतिप्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला.