कर्करुग्णांना संत गाडगेबाबा धर्मशाळेचा आधार

एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला असे कळताच त्याच्या पायाखालची जमीन सरकते. अशा वेळी मुंबईबाहेरच्या कर्करोगग्रस्त रुग्ण आणि नातेवाईकांसमोर मुंबईत राहून उपचार कसे घ्यायचे, पैशांची अडचण, जेवणाचे हाल, राहण्याची सोय असे एक ना अनेक प्रश्न उभे राहतात. या प्रसंगी, दादर येथील संत गाडगेबाबा धर्मशाळेने आसरा दिला आहे. आतापर्यत १२ लाखा कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना या धर्मशाळेने मदत केली आहे. शिवाय टाळेबंदी काळात मुंबईत अडकलेल्या अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना घरापर्यंत पोहोचवण्याचे कामही या संस्थेने केले.