सेव्ह आरेच्या कार्यकर्त्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

आरे वाचवा या मोहिमेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, शर्मिला राज ठाकरे यांनी वेळोवेळी सेव्ह आरे आणि पर्यावरणप्रेमी संस्थाना पाठिंबा दिला. आरे वाचवण्यासाठी स्वतः राज ठाकरे तसेच त्यांचे कुटुंबीय अनेक वेळा आंदोलनात सहभागी झाले. सरकारकडे मनसेच्या वतीने निवेदन दिले. वेळ पडल्यावर आरेचे जंगल वाचवण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरली हे संपूर्ण महाराष्ट्राने व आरे प्रेमी जनतेने बघितले आहे. त्यामुळे एक कृतज्ञता म्हणून सेव्ह आरेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी त्यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली.