विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नका

एकीकडे देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात शाळा सुरु करण्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा मानस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, मुंबई महापालिकेच्या शाळा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. यावरुन शिक्षण नियोजनाबाबत सावळा गोंधळ सुरु असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. विशेष म्हणजे यावरुन शाळा, कॉलेज नियोजनात शिक्षणमंत्री ‘नापास’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.