शरद पवारांचा सरकारवर घणाघात

Mumbai

आगामी विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर आहे.  याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी अकोल्यातील वाडेगांव येथे सभा घेतली. यावेळी लोकांना परिवर्तन पाहिजे, तसंच, शिवसेना आणि भाजपाला दूर लोटण्याची इच्छा असून निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या सरसकट कर्जमाफी या वक्तव्याची पुन्हा एकदा पवारांनी आठवण करुन दिली. शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं का? असा सवाल देखील शरद पवारांनी विचारला.