शर्मिला ठाकरेंनी वाडियासाठी घेतली अजित दादांची भेट

वाडिया रुग्णालय बंद पडू नये आणि त्यासाठी राज्य सरकारने मदत करावी, ही मागणी घेऊन मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर शर्मिला ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.