अर्णब गोस्वामीच्या विरोधात शिवसेना आक्रमक

रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामी हा तीनपाट पत्रकार असून सुपारीबाज पत्रकारिता करतो असे सांगत शिवसेना आमदार त्याच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल त्याच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी करण्यात आली.