सायन रुग्णलयाने किडनी काढून मृतदेह दुसऱ्याला दिला? आरोप

सायन रुग्णालयाने अंकुश सुरवाडे या २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची किडनी काढल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. यानंतर कहर म्हणजे या तरुणाचा मृतदेह नातेवाईक ताब्यात घेणार त्याआधीच रुग्णालयाने मृतदेह दुसऱ्याच नातेवाईकांना दिला. त्यांनी त्यावर अंत्यसंस्कारही केले. या प्रकारानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार दाखल केली आहे. तसेच रुग्णालयाने किडनी चोरीचा आरोप फेटाळून लावला आहे. मात्र मृतदेहाची अदलाबदल झाली असल्याचे मान्य केले असून त्याबाबत दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.