सिद्धिविनायक मंदिर समिती देणार ५ कोटी

Mumbai

राज्यभरात सरकारने फक्त १० रुपयांत  शिवभोजन योजना सुरू केली असून या योजनेस प्रतिसादही चांगला मिळत आहे. ही योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचावी यासाठी राज्य सरकारच्या मदतीसाठी आता सिद्धीविनायक समितीनेही पुढाकार घेतला आहे. सिद्धीविनायक मंदिर न्यास ५ कोटी रुपयांचा निधी सरकारला शिवभोजन थाळीसाठी देणार आहे. तसा प्रस्ताव मंदिर न्यास विश्वस्तं मंडळाने मंजुर करून, राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाकडे पाठवला असल्याची माहीती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.